शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:13 AM2018-10-24T04:13:17+5:302018-10-24T04:13:49+5:30

उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला.

Congress faces protest over farmers' questions | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक

Next

नवी दिल्ली : उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला. मंगळवारी संसद मार्गावर अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू सह इतर राज्यातील शेतकरी ‘जबाब दो, हिसाब दो’ची घोषणा बुलंद करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अखिल भारतीय किसान शेतमजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत, अनुसूचित जाती सेलचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत तसेच इतर नेते उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास शेतकºयांनी पटोलेंच्या नेतृत्वात संसदेला घेराव घालण्यासाठी आंदोलन स्थळावरुन मार्गक्रमण केले. आंदोलकांना रोखण्यासाठी त्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पटोलेंनी काही आंदोलकांसह बॅरेकेडवर चढून घोषणाबाजी के ली. पोलिसांनी नाना पटोलेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने शेतकºयांना एकत्रित करुन वातवरण निर्मिती करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याची चर्चा होती.
>मोदी हटाओ -सातव
शेतकरी क र्जमाफीसंबधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रश्न विचारतात तेव्हा शेतकरी कर्जमाफी हा आमचा अजेंडा नसल्याचे उत्तर केंद्र सरकार देते. अनिल अंबानी यांच्या सोबत पॅरिसमध्ये मोदी भेट घेतात. सत्तेवर येतातच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली. राहुल गांधींच्या सांगण्यावरुन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी कर्जमाफी दिली. गेल्या वर्षात महाराष्ट्राने शेतकºयांचे कर्जमाफ केले. प्रत्यक्षात वर्ष उलटून केवळ ५ टक्के शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाल्याचा दावा खासदार राजीव सातव यांनी केला.

Web Title: Congress faces protest over farmers' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.