शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काँग्रेसकडून कॉस्ट कटिंग; अनेक विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 2:44 PM

लोकसभा निवडणुकीनंतर पैशांची चणचण

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेस समोरील संकटं संपताना दिसत नाहीत. राहुल गांधींनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा, कर्नाटकमधील आमदारांचं बंड यानंतर आता पक्ष आर्थिक अडचणीत सापडला आहे. देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला पैशांची चणचण जाणवू लागली आहे. त्यामुळेच पक्षाकडून विविध विभागांना दिलेल्या निधीत कपात करण्यात आली आहे. 'इंडिया टुडे'नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आली आहे. पक्षाकडून आता सेवादलाला दर महिन्याला 2 लाखांऐवजी दीड लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय पक्षाकडून महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि युवक काँग्रेसला खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पगारच मिळालेला नाही. केवळ काँग्रेस संघटनेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची अवस्थादेखील बिकट आहे. आधी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीममध्ये 55 कर्मचारी होते. मात्र आता 35 कर्मचारी आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेकांनी सोशल मीडिया टीममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्या टीममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील उशिरा पगार मिळत आहे. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस