आता काँग्रेस संपली, असदुद्दीन ओवेसींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 12:38 PM2018-06-09T12:38:48+5:302018-06-09T13:04:50+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवल्यामुळे विरोधक मोठ्या प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करत आहे.
हैदराबाद - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवल्यामुळे विरोधक मोठ्या प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करत आहे. अन्य विरोधी पक्षांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. 'संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काढल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी RSSच्या दारावर डोके टेकले. आता काँग्रेसकडून काहीच अपेक्षा राहिल्या नाहीत. आता काँग्रेस संपली आहे,' अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. हैदराबादमधील एका जाहीरसभेत ते बोलत होते.
#WATCH: At an event in Hyderabad, yesterday, AIMIM Chief Asaduddin Owaisi said, 'Congress is finished. A man who spent 50 years in Congress & was President of India visited RSS headquarters. Do you still have hopes from this party?' pic.twitter.com/3qV12JvieO
— ANI (@ANI) June 9, 2018
''काँग्रेस आता संपली आहे. ज्या व्यक्तीनं आयुष्यातील 50 वर्ष काँग्रेस पक्षात काढली. ज्यांनी देशाचं राष्ट्रपती पद भूषवलं. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आपले डोके टेकवलं. अशा पक्षाकडून तुम्हाला आताही अपेक्षा आहेत?'', असा प्रश्नदेखील ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.