बेंगळुरू : कर्नाटकमधील जिल्हा परिषद आणि तहसील पंचायत निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेसने आघाडी मिळवत वर्चस्व राखले आहे. या राज्यात १३ आणि २० फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी सुरू झाली.जिल्हा परिषदेतील एकूण १०८३ जागांपैकी ९१३ जागांचे निकाल घोषित झाले असून काँग्रेसने ४२८ तर भाजपने ३५९ जागांवर विजय मिळविला. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जद(एस) या पक्षाने ९८ जागांवर तर अपक्षांनी २६ जागा काबीज केल्या. ग्रामीण स्तरावरील या निवडणुकीत जनतेच्या राजकीय कलाचे संकेत मिळत असून तीन वर्षांपूर्वी सत्तारूढ झालेल्या काँग्रेस सरकारप्रति विश्वासही त्यातून दिसून येत असल्याचे मानले जाते.तहसील पंचायतीतील ३८८४ पैकी ३१८६ जागांचे निकाल घोषित झाले. काँग्रेसला १४०३ जागांवर विजय मिळविला. भाजप आणि जद(एस)ने अनुक्रमे ११२३ आणि ४७२ जागा जिंकल्या. (वृत्तसंस्था)गुजरातमध्ये भाजपचअहमदाबाद : गुजरातमधील २७ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजपला १५ नगरपालिकांमध्ये विजय मिळाला आहे, तर काँग्रेसला ८ पालिकांमध्ये बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी एका नगरपालिकेत यश मिळाले असून, अन्य दोन ठिकाणी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. हा काँग्रेसचा पराभव असल्याची भाजपने म्हटले आहे, तर आमची स्थिती सुधारली असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
कर्नाटकच्या पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा
By admin | Published: February 24, 2016 3:41 AM