शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 6:11 AM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकात एकच उपमुख्यमंत्री असेल यावर त्यांची सहमती झाली. 

आदेश रावल - नवी दिल्ली : कर्नाटकबाबत ४८ तासांपासून सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युला काँग्रेसने तयार केला आहे. याबाबत औपचारिक घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाणार आहे. काँग्रेसने जो फॉर्म्युला तयार केला आहे त्यानुसार, डी. के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्षही राहतील तसेच, शिवकुमार यांना त्यांच्या पसंतीचे मंत्रालयही देण्यात येईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकात एकच उपमुख्यमंत्री असेल यावर त्यांची सहमती झाली. 

१८ मे रोजी शपथविधी?   - कर्नाटकातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १८ रोजी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्व त्यादृष्टीने तयारी करत आहे. राहुल गांधी यांचे असे मत आहे की, ज्यांच्याकडे आमदारांचे समर्थन आहे त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे. - जेव्हा निरीक्षकांना पाठविण्याचा मुद्दा समोर आला तेव्हा जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांना पाठविले. ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. - आमदारांकडून गोपनीय मतदान करून घेतले तेव्हा सर्वाधिक आमदारांचे समर्थन सिद्धरामय्या यांना असल्याचे दिसून आले. त्यानंतर कर्नाटकचे चित्र स्पष्ट झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या नावांची लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल.

दिवसभर नेत्यांचे बैठकांचे सत्रनवी दिल्लीत मंगळवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. सायंकाळी कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार हे खरगे यांना भेटण्यासाठी दाखल झाले. याचवेळी के. सी. वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची बैठक १०, जनपथ येथे होत होती. 

उपमुख्यमंत्री एकचमल्लिकार्जुन खरगे यांची अशी इच्छा होती की, त्यांचे निकटवर्तीय माजी प्रदेशाध्यक्ष व दलित नेते जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. पण, डी. शिवकुमार यांची अशी अट आहे की, ते एकटेच उपमुख्यमंत्री असतील. त्यांची ही मागणी पक्षनेतृत्वाने स्वीकारली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे