नवी दिल्ली : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल वा सत्तेपाशी पोहोचेल. तेलंगणात टीआरएसच सत्तेत येईल आणि मिझोरममधील काँग्रेसची सत्ता जाऊ शकेल.राजस्थान व तेलंगणात शुक्रवारी अुनक्रमे ७२.६८ व ६८ टक्के मतदान झाले. ते संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष येऊ लागले. मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजपात चुरशीची लढत दिसत असून, तीन चाचण्यांनी काँग्रेसला बहुमत मिळेल वा तो पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे. राजस्थानमध्ये १0 संस्था व वृत्तवाहिन्यांनी मिळून एक्झिट पोल घेतले. त्यात भाजपाच्या पराभवाचे निष्कर्ष निघाले आहेत.छत्तीसगडही भाजपाकडे राहणे अवघड दिसत आहे. तिथे काँग्रेसचे सरकार येईल, असे तीन पोलचे निष्कर्ष आहेत. तिथे १५ वर्षे भाजपा सत्तेत आहे. तेलंगणात टीआरएसच पुन्हा सत्तेवर येईल, असे निष्कर्ष असून, मिझोरम कदाचित काँग्रेसच्या हातातून मिझो नॅशनल फ्रंटकडे जाऊ शकेल.>काही चाचण्यांचे निष्कर्षमध्य प्रदेश 230 जागा 75% मतदानसर्वे भाजपा काँग्रेस इतरअॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15एबीपी-लोकनीती 94 126 10इंडिया न्यूज-नेता 106 112 12रिपब्लिक 108-128 95-115 7न्यूज नेशन 108-112 105-109 11-15इंडिया टीव्ही 122-130 86-92 6-92013 मध्ये । भाजपा 165 । काँग्रेस 58>राजस्थान 199 जागा 73% मतदानसर्वे भाजपा काँग्रेस इतरइंडिया-टुडे अॅक्सिस 55-72 119-141 04-11टाइम्स नाउ-सीएनएक्स 85 105 09रिपब्लिक-सी वोटर 83-103 81-101 152013 मध्ये । भाजपा 163 । काँग्रेस 21>छत्तीसगड 90 जागा 75%सर्वे भाजपा काँग्रेस इतरइंडिया न्यूज-नेता 43 40 07टाइम्स नाउ-सीएनएक्स 46 35 07इंडिया टुडे 21-31 55-65 04-08न्यूज नेशन 38-42 40-44 04-08>मिझोरम 40 जागा 80%सर्वे काँग्रेस एमएनएफ इतररिपब्लिक-सी वोटर 14-18 16-20 3-10टाइम्स नाउ-सीएनएक्स 16 18 062013 मध्ये । काँग्रेस 34>तेलंगणा 119 जागा 67%सर्वे टीआरएस काँग्रेस+ भाजपा इतरसी वोटर 54 53 5 7इंडिया टुडे 85 27 2 5जन की बात 57 45 5 12न्यूजएक्स 57 46 6 10टाइम्स नाऊ 66 37 7 92014 मध्ये । टीआरएस 63 । काँग्रेस 21 । इतर 27>पोल ऑफ पोलमध्य प्रदेश भाजपा 109 काँग्रेस 111 इतर 10राजस्थान भाजपा 78 काँग्रेस+ 110 इतर 11छत्तीसगड भाजपा 41 काँग्रेस+ 43 इतर 06
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 6:12 AM