देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 05:22 PM2018-09-01T17:22:54+5:302018-09-01T17:57:34+5:30

काँग्रेस सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

Congress had left the nation’s economy on a land mine - PM Narendra Modi | देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

Next

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या थकीत कर्जांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी ठरवतानाच आपल्या सरकारने थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना हे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. 




 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) चे उदघाटन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी देशातील बँकिंग प्रणालीच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, " थकबाकीदारांकडून पै पै वसूल करण्याचे काम सरकार करत आहे. यूपीए सरकारच्या काळात काही नामदारांना एका फोनवर सहा वर्षांमध्ये लाखो कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस या देशाची अर्थव्यवस्था भूसुरुंगावर ठेवून गेली आहे, असे आम्हाला वाटू लागले." 



 

यावेळी मोदींनी बँकांमधून करण्यात आलेल्या बेसुमार कर्जवाटपावरही बोट ठेवले. ते म्हणाले,  स्वातंत्र्यानंतर 2008 पर्यंत देशातील सर्व बँकांनी एकूण 18 लाख कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र 2008 पासून पुढच्या सहा वर्षांमध्ये हा आकडा वाढून 52 लाख कोटींपर्यंत पोहोचला. कर्ज घेऊन जा, नंतर मोदी येईल आणि रडारड करेल, असेच धोरण सुरू होते. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जितके कर्ज दिले गेले, त्याच्या दुप्पट कर्जवाटप गेल्या सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दिले गेले,"  मात्र थकीत कर्जवसुलीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांकडून पै पै वसूल केली जाईल. तसेच आमच्या सरकारच्या काळात अशा थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले गेलेले नाही, असा दावाही मोदींनी केला.





 यावेळी पोस्टल बँकेच्या सुविधेचेही मोदींनी कौतुक केले. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सुविधेमधून लोकांपर्यंत पोहोचणारे टपाल सेवक हे केवळ डिजिटल बँकरच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी डिजिटल टिचर ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या तिमाहीत देशाच्या विकास दरात झालेल्या वाढीबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. 

Web Title: Congress had left the nation’s economy on a land mine - PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.