खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 06:56 PM2018-09-29T18:56:17+5:302018-09-29T19:28:56+5:30

Congress has become shameless for false propaganda: Modi | खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

Next

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्यासाठी बेशरम झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.




भाजपच्या एका कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले आहे. इंदन वाढले तरीही भाजपने रोजच्या जिवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले नाहीत. महागाईला नियंत्रमात ठेवले आहे. काँग्रेस सरकार 10 टक्क्यांवर होती, आमच्या सरकारच्या काळात महागाईदर 3-4 टक्क्यांवर आला आहे. 


यावेळी मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ज्या लोकांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना यापूर्वी 18 हजार रुपये कर भरावा लागत होता. आता 5 हजार रुपये भरावा लागत आहे. तसेच भविष्यात आयकर भरण्याचा स्लॅब 10 वरून 5 टक्के करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. वरिष्ठ नागरिकांसाठी टॅक्सही कमी करण्यात आल्याचे ते म्हणाले. 


मध्यम वर्गाला आपले घर खरेदी करणे कठीण बनत होते. आता ते स्वप्न पुर्ण करणे सोपे झाले आहे. गृह कर्जासाठी पुर्वी 10 टक्के व्याज द्यावे लागत होते, आता ते 8.75 टक्क्यांवर आले आहे. यामुळे लोक वर्षाला 35-40 हजार रुपये वाचवत आहेत. तसेच इतरही कर्जे स्वस्त झाली आहेत. महत्वाचा म्हणजे मोबाईल डेटास्वस्त झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले. 



भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी राहुल गांधी यांच्या सरदार वल्लभ भाई पटेलांच्या पुतळ्यावरील वक्यव्याचा समाचार घेतला. काँग्रेस पक्ष खोटे दावे खपविण्यासाठी निर्लज्जपणाचा आधार घेत आहे. काँग्रेसने पटेल यांची आजपर्यंत आठवणही काढली नाही, देश त्यांचा सन्मान करत आहे, तर काँग्रेसला ते चालत नाहीय, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Congress has become shameless for false propaganda: Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.