शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
3
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
4
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
5
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
6
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
7
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
8
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
9
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
10
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
11
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
12
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
13
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
14
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
15
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
16
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
17
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीची सातवी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 1:37 AM

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज रात्री उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. सातव्या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज रात्री उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. सातव्या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसकडून आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये  महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. तसेच या यादीत छत्तीसगडमधील चार, जम्मू काश्मीरमधील तीन, ओदिशामधील दोन, तामिळनाडूमधील आठ, तेलंगाणामधील एक, त्रिपुरामधील दोन, उत्तर प्रदेशमधील नऊ आणि पुदुच्चेरीमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.  काँग्रेसच्या आजच्या यादीमधून चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, भिवंडी आणि लातूर येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. चंद्रपूर येथून  विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जालन्यामधून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी होईल. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर भिवंडीमधून माजी खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच आरक्षित मतदारसंघ असलेल्या लातूर येथून मच्छिंद्रनाथ कामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

आजच्या यादीत काँग्रेसने उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना फतेहपूर सिकरी येथून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर रेणुका चौधरी या  तेलंगाणामधील खम्मम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक