Gujarat Assembly Elections : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार, मुलांसोबत प्रचार केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:29 AM2022-11-23T10:29:10+5:302022-11-23T10:30:02+5:30

Gujarat Assembly Elections : रिवाबा यांच्यावरील आरोपांदरम्यान रवींद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबा यांना लक्ष्य केले आहे. 

congress has filed a complaint against ravindra jadeja's wife rivaba in the election commission, gujarat assembly elections | Gujarat Assembly Elections : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार, मुलांसोबत प्रचार केल्याचा आरोप

Gujarat Assembly Elections : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार, मुलांसोबत प्रचार केल्याचा आरोप

Next

अहमदाबाद : क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा विरोधात निवडणूक आयोगाकडे (EC) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलांसोबत निवडणूक प्रचार केल्याचा आरोप रिवाबा यांच्यावर आहे. काँग्रेस नेते सुभाष गुजराती यांनी मंगळवारी ही तक्रार केली आहे. दरम्यान, रिवाबा यांच्यावरील आरोपांदरम्यान रवींद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबा यांना लक्ष्य केले आहे. 

रिवाबा निवडणूक प्रचारात मुलांचा वापर करत आहे. हे स्पष्टपणे बालमजुरीचे प्रकरण आहे, असे नयनाबा यांनी म्हटले आहे. तसेच, रिवाबा जामनगर उत्तरमधून उमेदवार आहेत, तर त्या स्वत: राजकोट पश्चिमच्या मतदार आहेत. त्यांनी तेथून निवडणूक लढवावी. जामनगरमध्ये रिवाबा कुठल्या अधिकाराने मते मागत आहेत, तर इथले प्रश्नही त्यांना माहीत नाहीत, असे नयनाबा यांनी सांगितले.

लग्नानंतरही नाव बदलले नाही
लग्नानंतरही रिवाबा यांनी नाव बदलले नसल्याचा दावाही नयनाबा यांनी केला आहे. रिवाबा अजूनही आपले पूर्ण नाव रिवा सिंग हरदेव सिंग सोलंकी लिहिते. तसेच, रिवाबा या रवींद्र जडेजाचे नाव कंसात लिहितात. त्या फक्त रवींद्र जडेजाचे नाव वापरत आहेत, असेही नयनाबा यांनी म्हटले आहे.

भाजपकडून रिवाबा यांना उमेदवारी
भाजपने जामनगर उत्तरमधून रिवाबा यांना उमेदवारी दिली आहे. 14 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेकडो समर्थकांसह जामनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन म्हणून, भाजपने रिवाबा यांच्या समर्थनार्थ एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित केला होता. या कार्यक्रमात रिवाबा यांचे पती रवींद्र जडेजा देखील सहभागी झाले होते. रिवाबा यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार असल्याची चर्चा फार पूर्वीपासून होती. जामनगरमधील भाजपशी संबंधित राजकीय कार्यक्रमांमध्ये त्या अनेकदा दिसल्या आहेत. त्या सौराष्ट्र करणी क्षत्रिय सेनेच्या अध्यक्षाही होत्या. 

नयनाबा-रिवाबा यांच्यातील राजकीय वादाची चर्चा
रिवाबा यांचे जामनगरशी विशेष नाते आहे, कारण त्यांचा बहुतांश वेळ राजकोट आणि जामनगरमध्येच गेला आहे. जडेजाची बहीण नयनाबा जडेजा सध्या जामनगरमध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. अशा स्थितीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या सहभागामुळे नणंद आणि भावजय (नयनाबा आणि रिवाबा आणि) यांच्यातील वादाची चर्चाही चव्हाट्यावर येत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये मास्क न घालण्यावरून नयनाबा आणि रिवाबा यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाले होते.

Web Title: congress has filed a complaint against ravindra jadeja's wife rivaba in the election commission, gujarat assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.