काँग्रेसने काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 04:54 AM2019-10-18T04:54:06+5:302019-10-18T04:54:09+5:30
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा आरोप
बवानी खेडा : काँग्रेसने काश्मीरच्या मुद्याचे आंतरराष्ट्रीयकरण केल्याचा आरोप केंद्रीय संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी केला. राजनाथसिंह म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसच्या एका नेत्याने अलीकडेच लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्याशी लंडनमध्ये चर्चा केली होती.
राजनाथसिंह यांनी काँग्रेसला सवाल केला आहे की, मानवाधिकाराचे उल्लंघन कुठे झाले आहे? जेव्हा काश्मिरात दहशतवादी कारवाया होत होत्या, तेव्हा आपण काही का बोलत नव्हते? काँग्रेसकडून यावर उत्तर हवेय की, काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न असताना दुसऱ्या देशांसोबत यावर चर्चा व्हायला हवी? आपण काश्मीर मुद्यांवर दुसºया देशांशी चर्चा करणार आहात?
सनी देओल यांचा प्रचार
चंदीगड : हरयाणातील मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्यासाठी भाजपचे खासदार आणि बॉलीवूड कलाकार सनी देओल यांनी गुरुवारी प्रचार केला. हिसार जिल्ह्यातील नारनौंदमधून अभिमन्यू हे पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. एका सभेत बोलताना सनी देओल म्हणाले की, यावेळी मी कॅप्टन अभिमन्यू यांच्यासाठी मते मागण्यास आलो आहे. यावेळी गदर चित्रपटातील संवाद म्हणून सनी देओल यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘हिंदुस्तान जिंदाबाद है और रहेगा’ या डायलॉगला नागरिकांनीही प्रतिसाद दिला.