आमचं मुख्यालय ३० कोटींत विकत घ्या; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या ऑफरला काँग्रेसकडून जबरदस्त उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 05:23 PM2020-07-22T17:23:31+5:302020-07-22T17:28:57+5:30
प्रदेश कार्यालय, ट्रस्टमधील गैरव्यवहारावरून काँग्रेस, भाजपामध्ये जुंपली
चेन्नई: भाजपाचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. एस. अलगिरी यांना पक्षाचं मुख्यालय ३० कोटींना विकत घेता का, असं म्हणत ऑफर दिली. त्याला अलगिरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. आमच्याकडे पीएम केअर आहे का, असा खोचक सवाल करत अलगिरींनी मुरुगन यांना प्रत्युत्तर दिलं. पीएम केअर ट्रस्टमधील पैशांचा चुकीचा वापर तर झाला नाही का, हे शोधण्यासाठी चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.
तमिळनाडू काँग्रेस कमिटी ट्रस्टमध्ये अनियमितता असल्याचं मुरुगन यांनी शनिवारी म्हटलं. या प्रकरणी आयकर विभागानं चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित ट्रस्ट पक्षाचं नेतृत्व नव्हे, तर इतर व्यक्ती चालवतात, असं प्रत्युत्तर अलगिरी यांनी मुरुगन यांना दिलं. भाजपानं त्यांचं तमिळनाडूतील मुख्यालय ३ कोटींमध्ये खरेदी केलं. खरंतर त्या जागेची किंमत ३० कोटी होती. मात्र भाजपानं त्या जागेच्या मालक असलेल्या मुक्ता श्रीनिवासन यांना धमकावून ती ३ कोटीत खरेदी केली, असा आरोपदेखील अलगिरींनी केला.
अलगिरी यांनी भाजपा मुख्यालय आणि त्याच्या किमतीवरून केलेल्या आरोपांना मुरुगन यांनी एका पत्रकातून उत्तर दिलं. 'त्यांनी (अलगिरींनी) हा आकडा कुठून आणला माहीत नाही. मात्र आम्ही त्यांना ३० कोटी रुपयांमध्ये कार्यालयाची जागा देण्यास तयार आहोत. ते विकत घेण्यास तयार आहेत का?,' असा सवाल मुरुगन यांनी केला. त्याला आमच्याकडे पीएम केअर नाही, असं म्हणत अलगिरींनी प्रत्युत्तर दिलं.
भाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणार
युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ