नवी दिल्ली : भाजपा प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी बॅनर लावल्याने राजकीय वाद उफाळून आला आहे. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत प्रमुख चौकांसह भाजपाच्या मुख्यालयाबाहेर बॅनर लावले आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना 'फादर ऑफ मॉब लिंचिंग' म्हटले आहे. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत राहणाऱ्या तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिल्लीत लावलेल्या बॅनरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे, 'होय, राजीव गांधी फादर ऑफ मॉब लिंचिंग होते'.
दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.