"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:18 PM2020-06-19T16:18:33+5:302020-06-19T16:36:34+5:30

"आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही."

Congress' Husain Dalwai slams modi government over India China Faceoff | "सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

Next

भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

हुसेन दलवाई यांनी आपण सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच 'सैनिक जर लढले असते व काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवता, RSS च्या लोकांना तिथे पाठवा, काठी घेऊन ते सीमेची सुरक्षा करतील' असं म्हणत टोला लगावला आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ती चांगली गोष्ट आहे. मात्र ही बैठक फार उशीरा होत आहे. आधीच व्हायला हवी होती. घुसखोरी किती प्रमाणात झाली याची पूर्णपणे माहिती मिळणे आवश्यक आहे. यामध्ये देशाला विश्वासात घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. ते मोठ्याप्रमाणावर आतमध्ये आले आहेत. दुःखद म्हणजे आपले 20 जवान शहीद झाले आहेत आणि ते निःशस्त्र गेले होते. चीनचे सैनिक खिळे व लोखंड बसवलेल्या काठ्या घेवून आले होते. त्या काठ्यांनी त्यांनी मारहाण केली. त्यांचा एकही सैनिक मेला नाही. आपले जवान शहीद झाले तर अनेकजण जखमी झाले. जखमी झालेले आता लवकरात लवकर सीमेवर पुन्हा जातील असं सांगितलं जात आहे. मात्र मला तसं वाटत नाही. मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवतात, RSS च्या लोकांना काठी घेऊन पाठवा, ते सीमेची सुरक्षा करतील' असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या

वरात, विधीसह रंगला विवाहसोहळा पण लग्नात नवरी ऐवजी होता पुतळा... एका लग्नाची गोष्ट

Flipkart Big Saving Days : खूशखबर! फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल, स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर सूट

कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

"पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका

 

Web Title: Congress' Husain Dalwai slams modi government over India China Faceoff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.