शहरं
Join us  
Trending Stories
1
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
2
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
3
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
4
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
5
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
6
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
7
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
8
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
9
सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय?
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
11
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
12
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
13
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
14
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
15
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
16
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
18
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
19
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
20
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

'काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला', सोनिया-राहुल यांच्या 'त्या' वक्तव्यावर पीएम मोदींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:29 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

PM Narendra Modi Slams Sonia Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी(31 जानेवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी द्रौपदी मुर्मूंना (Draupadi Murmu) 'पुअर लेडी' म्हटले. यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केलापंतप्रधान मोदी म्हणाले की, 'देशाने पुन्हा काँग्रेसचे शाही राजघराणे पाहिले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत संबोधित केले. ओरिसातील एका गरीब कुटुंबातून त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी नाही, उडिया भाषेत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी आज संसदेत उत्कृष्ट भाषण केले. पण काँग्रेसचच्या राजघराण्याने त्यांचा अपमान केला. राजघराण्यातील एका सदस्याने (राहुल गांधी) राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले. तर, आणखी एका सदस्याने (सोनिया गांधी) पुअर लेडी म्हटले.' 

'एका आदिवासी महिलेचे बोलणे काँग्रेसला कंटाळवाणे वाटते. हा देशातील 10 कोटी आदिवासी बांधवांचा अपमान आहे. काँग्रेस प्रत्येकवेळी गरीब, दलित आदिवासींचा अपमान करते. काँग्रेसला परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे आणि शहरी नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे आवडते,' अशी टीका पीएम मोदींनी यावेळी केली.

नड्डांचा काँग्रेसवर निशाणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सोनिया गांधींनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या टिप्पणीबाबत पोस्ट केली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी त्यांच्या वक्तव्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी पुअर लेडी हा शब्दप्रयोग केला, ज्याचा मी आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तीव्र निषेध करतो. अशा शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केल्याने काँग्रेसचा गरीब विरोधी, आदिवासी विरोधी चेहरा दिसून येतो, अशी टीका भाजपाध्यक्षांनी केली. तसेच, काँग्रेसने राष्ट्रपती आणि आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

'सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेला धक्का'राष्ट्रपती भवनाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी (31 जानेवारी) राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे या सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. या नेत्यांनी म्हटले की, (अभिभाषणाच्या शेवटी) राष्ट्रपती खूप थकल्या होत्या, त्यांना बोलता येत नव्हते. राष्ट्रपती कधीही थकल्या नाहीत. उलट, उपेक्षित समुदाय, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलण्यावर त्यांचा विश्वास आहे. अशाप्रकारच्या टिप्पण्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूBJPभाजपाcongressकाँग्रेस