शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 9:03 PM

"दलित आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवले."

PM Narendra Modi on Jammu Kashmir &  Haryana Election Results 2024 : आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली, तर हरयाणात एकहाती सत्ता मिळवली. विशेष म्हणजे, हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

हरियाणाच्या जनतेने नवा इतिहास रचलाभाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी म्हणाले की, हरयाणातील जनतेने आज एक नवा इतिहास रचला आहे. हरियाणाची स्थापना 1966 मध्ये झाली, तेव्हापासून मोठ्या दिग्गजांनी या राज्यावर राज्य केले. एक काळ असा होता की, हरयाणातील दिग्गज नेत्यांची नावे संपूर्ण देशात प्रसिद्ध होती. हरियाणात आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी 10 निवडणुकांमध्ये हरयाणातील जनतेने दर पाच वर्षांनी सरकार बदलले. पण, यावेळी हरियाणातील जनतेने जे केले, ते अभूतपूर्व आहे. हरयाणाच्या लोकांनी चमत्कार केला आणि भाजपला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. आज नवरात्रीचा सहावा दिवस, म्हणजेच माँ कात्यायनीचा दिवस आहे. आई हातात कमळाचे फुल धरून आपल्याला आशीर्वाद देते. अशा या शुभदिनी हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे.

भारताविरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रात काँग्रेस नेते सामील पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आज हरियाणाने काँग्रेसला स्पष्ट संदेश दिला आहे की, देशविरोधी राजकारण चालणार नाही. हरयाणातील प्रत्येक समाजाने, प्रत्येक कुटुंबाने एकजुटीने मतदान केले. देशभक्तीने भरभरून मतदान केले. हरयाणाने देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला. भारताची शांतता नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहेत, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे साथीदार या खेळात सामील आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला. 

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन फिरणारे....काँग्रेस जाती-जातींमध्ये विष कालवत आहे. जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन फिरत आहेत, ते जातीच्या नावावर लोकांना भडकवत आहेत. दलित आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवले. हे तेच लोक आहेत, जे सत्तेवर आल्यास एकाही गरीब दलित आदिवासीला पंतप्रधान होऊ दिले नाहीत. काँग्रेस परिवार दलित आणि मागास आदिवासींचा द्वेष करते. काँग्रेस आरक्षण संपवणार होते. हरियाणात सरकार स्थापन झाल्यास ती हेच करणार होते. समाज कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हरियाणातील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न झाला, पण शेतकऱ्यांनी हा हाणून पाडला, अशी टीकाही मोदींनी केली. 

काँग्रेसला नो एंट्री...पीएम मोदी पुढे म्हणाले की, भाजप हा फक्त जगातील सर्वात मोठा पक्षच नाही, तर हा बहुतेकांच्या हृदयात स्थिरावला आहे. हरियाणात जनतेने विकासाच्या मुद्द्यावर हॅट्ट्रिक केली आहे. जिथे जिथे भाजपचे सरकार बनते, तिथली जनता पुन्हा पुन्हा भाजपलाच निवडते. काँग्रेसने किती वर्षांपूर्वी सत्तेत पुनरागमन केले होते? देशात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे 50 ते 60 वर्षांपूर्वी काँग्रेस सत्तेत होती, परंतु लोकांनी त्यांना एकदाही परत येऊ दिले नाही. अनेक राज्यांनी काँग्रेससाठी नो एंट्रीचे बोर्ड लावले. 

काँग्रेस हा परजीवी पक्ष, आपल्याच मित्रांना खातो...पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, काँग्रेस हा असा परजीवी पक्ष आहे, जो आपल्याच मित्रपक्षांना गिळंकृत करतो. काँग्रेसला असा देश घडवायचा आहे की, जिथे लोक स्वतःच्या वारशाचा तिरस्कार करतील. देशवासीयांना ज्याचा अभिमान आहे, ते त्यांना कलंकित करायचे आहे. निवडणूक आयोग असो, देशाची सेना असो, न्यायव्यवस्था असो. काँग्रेसला प्रत्येक संस्था कलंकित करायची आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही या लोकांनी गदारोळ केला होता. निवडणूक आयोगाच्या घटनात्मक निष्पक्षतेला आव्हान देण्यासाठी त्यांचे शहरी नक्षलवादी सोबती सर्वोच्च न्यायालयात गेले. आजही काँग्रेसने देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी बोचरी टीकाही मोदींनी केली.

भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाहीकेंद्र असो वा हरियाणा, गेल्या 10 वर्षांत भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. जनतेच्या विकासासाठी आम्ही केवळ समर्पित भावनेने काम केले. यासाठी मी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. हरियाणाच्या विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. चांगल्या हेतूचे आणि चांगल्या धोरणांचे कौतुक केले तर काम करण्याची ऊर्जाही द्विगुणित होते. जम्मू-काश्मीरच्या जनतेने भाजपच्या लोकांना प्रोत्साहन दिले आहे. हा आशीर्वाद आपल्याला अधिक चांगले करण्याची प्रेरणा देतो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस