काँग्रेसने CBI द्वारे मला कैदी बनविले, वकील काँग्रेसी असून माझ्यासाठी लढला; अमित शाहा आज बोललेच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:18 PM2023-12-02T23:18:50+5:302023-12-02T23:19:20+5:30
सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस वारंवार चर्चेत येते. परंतू, अमित शाहा त्याची आठवण फार कमी काढतात. परंतू, आज शाहांनी तो प्रसंग बोलून दाखविला आहे.
अमित शाहागुजरातचे मंत्री असताना त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय राजवटीत तुरुंगात जावे लागले होते. यातून ते सहीसलामत सुटले. सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस वारंवार चर्चेत येते. परंतू, अमित शाहा त्याची आठवण फार कमी काढतात. परंतू, आज शाहांनी तो प्रसंग बोलून दाखविला आहे.
काँग्रेसने मला सीबीआयकडून तुरुंगात पाठविले. गुन्हा दाखल करायला लावला. एका मंत्रीपदावरून मी थेट कैदी झालो. अशावेळी काँग्रेसचाच एक वकील माझ्याबाजुने केस लढण्यासाठी पुढे आला, असे अमित शाहा म्हणाले. शाहा अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हायकोर्टात निरुपम नानावटी यांनी कशी मदत केली याचा उल्लेख केला.
दिव्यकांत नानावटी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निरुपम हे त्यांचेच पूत्र आहेत. दिव्यकांत नानावटी हे दोनवेळा आमदार राहिले होते. त्यांच्या योगदानावर शाहा यांनी स्तुतीसुमने उधळली.
पाच मिनिटांपूर्वी मी तुरुंगात मंत्री होतो, पाच मिनिटांनी मी कैद्यांतील एक झालो. माझ्यासाठी हा कठीण काळ होता. क्वचितच अशी कोणावर परिस्थिती ओढवली असेल. देवाने या जगात कोणाबरोबर असे केले नसेल परंतू माझ्यासोबत हे घडले. तेव्हा हेच निरुपम होते ज्यांनी तुलसीराम प्रजापती आणइ अन्य़ दोन एन्काऊंटर प्रकरणात वाचविले, असे शाहा म्हणाले.
कशी झाली काँग्रेसी वकिलाची निवड...
माझ्या अटकेनंतर काही वकील मित्र गुजरातमधील चांगल्या वकीलांच्या नावावर चर्चा करत होते. गुन्हेगारी कायद्याची जाण असलेला वकील हवा होता. निरुपम यांचेही नाव चर्चेत आले. परंतू, ते काँग्रेसचे सरचिटणीस झाले होते, त्यांची पार्श्वभूमी देखील काँग्रेसी होती. ते हा खटला लढतील का, असा प्रश्न आला त्यावर सर्वांचाच नकारात्मक टोन होता, असे शाहा म्हणाले.
मला देखील वाटले की ते असे करणार नाहीत. परंतू, एकदा विचारायला काय जाते, असा विचार केला. माझ्या एका मित्राने त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला आश्चर्यच वाटले की ते खटला लढण्यास तयार झाले. नुसते तयारच नाही झाले तर ते लढले आणि सर्वोच्च न्यायालयात देखील जिंकण्यास मदत केल्याचे शाहा म्हणाले.