“नवीन संसद ही ‘मोदी कॉम्प्लेक्स’, २०२४ मध्ये सत्ताबदलानंतर योग्य उपयोग होईल”: जयराम रमेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 05:54 PM2023-09-23T17:54:55+5:302023-09-23T17:56:28+5:30

Jairam Ramesh News: नवीन संसद भवनातील त्रुटी दाखवत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

congress jairam ramesh criticizes and said new parliament named modi multiplex or marriott | “नवीन संसद ही ‘मोदी कॉम्प्लेक्स’, २०२४ मध्ये सत्ताबदलानंतर योग्य उपयोग होईल”: जयराम रमेश

“नवीन संसद ही ‘मोदी कॉम्प्लेक्स’, २०२४ मध्ये सत्ताबदलानंतर योग्य उपयोग होईल”: जयराम रमेश

googlenewsNext

Jairam Ramesh News: गेल्या आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन झाले. या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले. तसेच आणखी एका विशेष कारणाने हे अधिवेशन महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे नवीन संसद. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज नवीन संसद भवनातून सुरू झाले. मात्र, यावरून विरोधकांकडून सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली जात आहे. नवीन संसदेला ‘मोदी कॉम्प्लेक्स’ म्हटले पाहिजे. २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवीन संसदेचा योग्य प्रकारे उपयोग होईल, या शब्दांत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निशाणा साधला. 

एवढ्या गाजावाजा करून नवीन संसद भवनात कामकाज सुरू झाले. मात्र, यामुळे प्रत्यक्षात पंतप्रधानांच्या उद्दिष्टांची जाणीव होते. याला मोदी मल्टिप्लेक्स किंवा मोदी मॅरियट म्हणावे. जुन्या संसद भवनापेक्षा नव्या संसदेत खासदारांना संवाद साधण्यासाठी जागा राहिली नाही. तसेच, कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या सुविधाही मिळत नाहीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. एक्सवर एक ट्विट करत जयराम रमेश यांनी नव्या संसद भवनातील त्रूटी दर्शवत केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

२०२४ मध्ये सत्तातरानंतर नवीन संसद भवनाचा चांगला वापर होईल

संसदेतील निखळ आनंद नाहीसा झाला आहे. जुन्या इमारतीत जाण्यासाठी उत्सुक असायचो. नवीन कॉम्प्लेक्स आरामदायी किंवा सुटसुटीत नाही. मला खात्री आहे की, माझ्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांना असेच वाटत असेल. सचिवालयातील कर्मचार्‍यांकडून असेही ऐकले आहे की, नवीन इमारतीच्या डिझाईनमध्ये त्यांना त्यांचे काम करण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टींचा विचार केला गेला नाही. लोकांशी सल्ला-मसलत न करता गोष्टी केल्या की, असे होते. २०२४ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर कदाचित नवीन संसद भवनाचा अधिक चांगला उपयोग होईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला. तसेच खासदारांना एकमेकांना पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागते, असा टोलाही लगावला.

दरम्यान, जयराम रमेश यांनी केलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसची मानसिकता वाईट आहे. १४० कोटी भारतीयांचा हा अपमान आहे. संसदेला विरोध करण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. १९७५ मध्येही काँग्रेसने असा प्रयत्न केला होता. पण, त्यांना अपयश आले, असा पलटवार नड्डी यांनी केला. 
 

Web Title: congress jairam ramesh criticizes and said new parliament named modi multiplex or marriott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.