CoronaVirus: “नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 03:18 PM2021-05-19T15:18:19+5:302021-05-19T15:21:38+5:30

CoronaVirus: केंद्रीयमंत्री यांनी एक सल्ला दिला आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकावर टीका करण्यात आली आहे.

congress jairam ramesh react on nitin gadkari corona vaccination suggestions | CoronaVirus: “नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा 

CoronaVirus: “नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा 

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकानितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची विचारणा

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री यांनी एक सल्ला दिला आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडूनपंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकावर टीका करण्यात आली आहे. (congress jairam ramesh react on nitin gadkari corona vaccination suggestions)

कोरोना लसींच्या कमतरतेमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात असलेल्या लसीकरण मोहिमेवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्ही कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असली, तरी लसींअभावी काही ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद होण्याच्या घटना घडत आहेत. यावर केंद्रीय नितीन गडकरी यांनी एक सल्ला दिला आहे. यामुळे लसींचा तुटवडा भासणार नाही, असे गडकरींनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विद्यापीठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 

YouTube कडून महिन्याला ‘इतके’ पैसे मिळतात; नितीन गडकरींनी सांगितला कमाईचा आकडा

त्यांचे बॉस ऐकतायत का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राची आठवण करून देत, हेच मनमोहन सिंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते. पण त्यांचे बॉस ऐकतायत का? अशी विचारणा जयराम रमेश यांनी ट्विटरवरून केली आहे.

 

काय सल्ला दिला नितीन गडकरींनी?

जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या. तसेच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे. माझी खात्री आहे की, प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. यानंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करू शकतील. हे १० ते १५ दिवसांत केले जाऊ शकते, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला.
 

Web Title: congress jairam ramesh react on nitin gadkari corona vaccination suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.