काँग्रेसचे ज्युनिअर मोदी म्हणतात... ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:39 AM2018-11-24T05:39:28+5:302018-11-24T05:40:00+5:30

‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’... असा नारा देत हुबेहुब पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दिसणारे आणि मोदींच्याच आवाजात प्रचारसभेत भाषण करणारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील अभिनंदन पाठक मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मदतीला धावून आले आहेत.

Congress junior Modi says, 'Friends, good days will not come!' | काँग्रेसचे ज्युनिअर मोदी म्हणतात... ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’!

काँग्रेसचे ज्युनिअर मोदी म्हणतात... ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’!

Next

- गजानन चोपडे

जबलपूर : ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’... असा नारा देत हुबेहुब पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दिसणारे आणि मोदींच्याच आवाजात प्रचारसभेत भाषण करणारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील अभिनंदन पाठक मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मदतीला धावून आले आहेत. यापूर्वी छत्तीसगडच्या निवडणुकीत नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यासह १०० सभांमधून भाजपविरोधी आगपाखड केली होती.
विशेष म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाठक यांनी वाराणसीत पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराची ९० दिवस धुरा सांभाळली होती आणि भाजपासाठी मते मागितली होती. मात्र काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन फोल ठरल्याने ते भाजपावर जाम संतापले आहेत. त्यामुळे भाजपावर तोंडसुख घेण्याची कुठलीही संधी ते सोडत नाहीत. अभिनंदन पाठक आता मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यांचा वापर काँग्रेस महत्त्वाच्या मतदारसंघात करत आहेत.
खुद्द ‘ज्युनिअर मोदी’च संकटमोचक बनून आल्याने काँग्रेस कार्यकर्ते खूश आहेत. पाठक यांच्या मते वाराणसीत भाजपाच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्याना आधी सन्मानाची वागणूक मिळत होती. मात्र आता भाजपा व मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने तीच माणसे भाजपाचे नेते व कार्यकर्ते यांचा अपमान करतात. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्याची भाषा वापरणारे आता गरिबांना महागाईच्या गर्तेत ढकलू पाहत आहेत. भाजपाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी काँग्रेसने आपल्याला आमंत्रित केले नसून आपण स्वयंस्फूर्तीने मतदारांपर्यंत जात असल्याचे ते सांगतात. राज्यात २८ डिसेंबर रोजी मतदान आहे.

लाहोर का विकास करना है?
भिंड जिल्ह्यातील लहार मतदारसंघात मुख्यमंत्री शिवाराज सिंग यांची सभा होती. भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करताना त्यांची जीभ घसरली आणि लहारऐवजी लाहोर असा उल्लेख केला. ते म्हणाले, लाहोर क्षेत्र का विकास ऐसा करना है की दुनिया देखती रह जाये’ विशेष म्हणजे त्यांची ही चूक कुणीही त्यांच्या लक्षात आणून दिली नाही. आता त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे. लाहोर या एका शब्दाने भाजपा कार्यकर्त्यांची टिंगल उडवली जात आहे. काँग्रेस कार्यकर्तेही हा व्हिडिओ विविध व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करीत आहेत.

पक्ष आणि उमेदवार सांगा, स्क्रिप्ट तयार
मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपा-काँग्रेससह अपक्ष उमेदवारही सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओ चालकांची तर चांगलीच कमाई होत आहे. फक्त पक्ष आणि उमेदवाराची माहिती द्या आणि प्रचाराची स्क्रिप्ट तयार. सिनेमातील गाण्याच्या चालीवर उमेदवाराचा प्रचार करणारे गीत तयार केले जाते. एका स्क्रिप्टसाठी १० ते ५० हजार रुपये मोजावे लागत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. जबलपूर शहरात तर रेकॉर्डिंग स्टुडिओ चालकांना सुगीचे दिवस आले आहेत.

लाहोर का विकास करना है
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीतही अभिनंदन पाठक यांनी भाजपा उमेदवारांना घाम फोडला होता. मोदींसारखी वेशभूषा धारण करून त्यांच्या आवाजाची नक्कल करतात, तेव्हा उपस्थित लोकही संभ्रमात पडतात.

Web Title: Congress junior Modi says, 'Friends, good days will not come!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.