शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"यांना शक्य झालं तर संसदही विकतील"; काँग्रेस नेत्याची अर्थसंकल्पावरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:03 PM

नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका, एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयास असल्याच्याही विरोधकांची टीका

ठळक मुद्देसोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्पसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी डिजिटल पद्धतीने सादर केला. प्रथमच अर्थमंत्री सीतारमन यांच्या हातामध्ये अर्थसंकल्पाची सुटकेस नव्हती तर लॅपटॉप होता. अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर करण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, कोरोना लसीकरण, मेट्रो प्रकल्प, जलजीवन मिशन अशा योजनांवर भर दिला आहे. मात्र सर्वसामान्यांनाची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामीण उद्योग, रोजगार, शिक्षण अशा बाबी दुर्लक्षित झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलवर अधिभार, नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका आणि एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा हा प्रयास असल्याच्याही टीका विरोधकांकडून होत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्रावर निशाणा साधला आहे."हा देशाचा अर्थसंकल्प आए की OLX ची जाहिरात. यांना शक्य झालं तर हे संसददेखील विकतील," असं म्हणत भाई जगताप यांनी केंद्र सकरावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. यावेळी त्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरूनही केंद्रावर टीकेचा बाण सोडला. "एकीकडे पेट्रोल डिझेल वरची एक्ससाईज ड्युटी कमी केली आणि दुसरीकडे दुसरीकडे तेव्हढाच पेट्रोलवर २.५० रुपये आणि डिझेल ४.०० रुपये कृषी सेस लावला. ६५ वर्षात ६५ रुपयांना मिळणारे पेट्रोल ६५ महिन्यांत शंभरी जवळ गेलंय, हाच का तो विकास?," असा सवालही त्यांनी केला. चिदंबरम यांच्याकडूनही टीका अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सीतारामन यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर देत टोला लगावला. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट ३६ प्रमाणे होती, असं म्हणत टोला लगावला.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Parliamentसंसदcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापTwitterट्विटरchidambaram-pcचिदंबरमbankबँकLIC - Life Insurance Corporationएलआयसी