नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे. सर्वच विरोधी पक्षांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही मात्र ते जनतेला 1970 ची कागदपत्रे विचारत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमातून बोलताना त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. बिहार व झारखंड राज्यातील लोकं आसाममध्ये कामा करण्यासाठी जातात, मात्र त्यांना सुद्धा घुसखोर म्हंटले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना घुसखोर म्हणणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, तुम्हाला तुमची पदवी दाखवता येत नाही, मात्र तुम्ही जनतेला 1970 ची कागदपत्र मागतायत ? असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदवीची मागणी केली तर ते दाखवत नाही. मग लोकांकडून 1970 ची कागदपत्रे कशी मागतात असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.