नवी दिल्ली -काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. काँग्रेस कार्यसमितीसह संघठनेतील मुख्य पदांसाठी निवडणूक व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर जे लोक निवडणुकीला विरोध करत आहेत, त्यांना आपले पद जाण्याची भीती वाटते. निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल. 'अन्यथा काँग्रेस पुढील 50 वर्ष विरोधातच बसत राहील,' असेही आझाद म्हणाले.
'पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणूक होणे आवश्यक' -गुलाम नबी आझाद म्हणाले, "गेल्या अनेक दशकांपासून, पक्षात निवडून आलेले घटक नाहीत, कदाचित आपल्याला 10-15 वर्षांपूर्वीच असे करायला हवे होते. आता आपण एका पाठोपाठ एक निवडणुका हरत आहोत. जर आपल्याला पुन्हा पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणुका घेऊन पक्षाला बळकटी द्यावी लागेल. जर माझ्या पक्षाची पुढील 50 वर्षांपर्यंत विरोधात बसण्याची इच्छा असेल तर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची काहीही आवश्यकता नाही."
'मला पक्षाध्यक्ष व्हायचं नाही' - आझाद म्हणाले, "मी एकदा मुख्यमंत्री राहिलो आहे, केंद्रीय मंत्री राहिलो आहे, पक्षात सीडब्ल्यूसी सदस्य आणि महासचिवही होतो. मला माझ्यासाठी कसलीही अपेक्षा नाही. मी पुढचे 5 ते 7 वर्ष सक्रिय राजकारणात राहील. माझी पक्षाध्यक्ष होण्याची इच्छा नाही. एका खऱ्या काँग्रेसी प्रमाणे, पक्षाच्या हितासाठी निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे."
'पक्षाचा पुढील अध्यक्ष निवडणूक जिंकून व्हावा' -एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना आझाद म्हणाले, "जेव्हा तुम्ही निवडणूक लढता, तेव्हा किमान 51 टक्के तुमच्या बाजूने असतात. इतर उमेदवारांना 10 किंवा 15 टक्केच मते मिळतात. जो जिंकेल आणि पक्षाध्यक्ष होईल त्याच्यासोबत 51 टक्के लोक असतील. मात्र, यावेळी जो कुणी पक्षाध्यक्ष होईल त्याच्या बाजूने एक टक्काही समर्थन नसेल. जर CWC चे सदस्य निवडून आले, तर त्यांना बाजूला केले जाऊ शकत नाही. यात समस्या कुठे?"
निवडणूक झाली, तर अनेक नेते गायब होतील -यावेळी निवडणुकीला विरोध करणाऱ्या नेत्यांनाही आझादांनी फैलावर घेतले. आझाद म्हणाले, जे प्रामाणिक असल्याचा दावा करत आहेत, खरे तर ते खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. तसेच ते पक्ष आणि देश हितासाठी धोकादायक आहेत. तसेच, "जे पदाधिकारी अथवा राज्यातील संस्थांचे घटक आमच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत, त्यांना माहीत आहे, की निवडणूक झाली तर ते पदावर राहणार नाही. काँग्रेससोबत जो एकनिष्ठ आहे, तो पत्राचे स्वागत करील. मी म्हटले आहे, की राज्य, जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर अध्यक्षांची निवड पक्ष कार्यकर्त्यांनी करायला हवी."
महत्त्वाच्या बातम्या -
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा