नवी दिल्ली- काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपानं संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे.ज्योतिरादित्य शिंदे यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला होता. फक्त त्यांनी आज याची ट्विटच्या माध्यमातून अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. भाजपातर्फे मध्य प्रदेशातील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर उद्या सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय बोर्डाची बैठक होऊ शकते. शहा यांच्या भेटीनंतर शिंदे आणि शहा मोदींच्या भेटीला गेले आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10 हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत
'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी
Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना