शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

बाळासाहेबांच्या कार्यशैलीने राहुल गांधी प्रभावित...; समजून घेण्यासाठी करणार महाराष्ट्र दौरा, राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 4:17 PM

महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसने 2019मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणाले...

 नवी दिल्ला - आज राजकारणातील बदलत्या समीकरणांचे मोठे उदाहरण म्हणजे, शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध. एकेकाळी काँग्रेसचे कट्टर विरोधक असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे कशा पद्धतीने पक्ष चालवायचे आणि इतर पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे संबंध कसे होते हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. 

महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसने 2019मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणाले, 'बैठकीदरम्यान आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राहुल गांधी अत्यंत सकारात्मक आणि आत्मविश्वासात असल्याचे दिसून आले.

राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान, संजय राऊतांशी साधला विशेष संवाद 

बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेणार आहेत राहुल -संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांची शिवसेनेच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. राहुल गांधींना बाळासाहेबांचा स्वभाव आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घ्यायचे आहे. सेना प्रमुखांनी पक्ष आणि नेत्यांना कशा पद्धतीने हाताळले आणि त्याचे इतर पक्षांच्या नेत्यांशी कसे संबंध होते, हेही त्यांना जाणून घ्यायचे आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेण्यास ते अत्यंत उत्सुक दिसत होते. एवढेच नाही, तर राहुल गांधी महाराष्ट्र दौरा आणि युतीच्या सर्व नेत्यांना भेटण्यासंदर्भातही बोलले आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनचा राहुल गांधींचा हा पहिलाच दौरा असेल.

इंडियन एक्सप्रेसनुसार, संजय राऊत म्हणाले, 'राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मात्र, ते कधी येणार हे त्यानी सांगितले नाही. काँग्रेस प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी म्हटले आहे, की राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या भेटीबाबत काँग्रेस मुख्यालयातून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. वेळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याची घोषणा करतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना