‘माेदीं’वरील वक्तव्यानंतर नाना पटाेले दिल्लीत दाखल; राहुल गांधींना कामगिरीचा अहवाल दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:25 AM2022-01-22T06:25:24+5:302022-01-22T06:27:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत तर गावातील गुंडाबाबत बाेललाे हाेताे, असा खुलासा केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी नाना पटाेले यांच्या विराेधात आंदाेलन उभारले आहे. हा वाद सुरू असताना नाना पटाेले यांनी दिल्ली गाठली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानानंतर भाजपच्या टीकेचे लक्ष्य झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले शुक्रवारी येथे आले. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत तर गावातील गुंडाबाबत बाेललाे हाेताे, असा खुलासा केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी नाना पटाेले यांच्या विराेधात आंदाेलन उभारले आहे. हा वाद सुरू असताना नाना पटाेले यांनी दिल्ली गाठली आहे. या भेटीमागे या वादाची काहीही पार्श्वभूमी नसल्याचा खुलासा पटाेले यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केला. काही दिवसांपूर्वी राज्यातील पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचा अहवाल देण्यासाठी आलाे आहे. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे. इतर पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. याचा सविस्तर अहवाल राहुल गांधी यांना दिला आहे.