पंजाब- उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये एकुण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि अन्य १ ठिकाणी आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे.
पंजाबमधील काँग्रेसच्या दारुन पराभवानंतर काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. लोकांचा आवाज, हा देवांचा आवाज आहे. पंजाबच्या जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारला आहे, असं म्हणत सिद्धू यांनी 'आप'चे अभिनंदनही केलं आहे.
पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. दिल्लीत आतापर्यंत जी आश्वासनं दिली ती अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केलं. आता तेच भगवंत मान दिल्लीत पूर्ण करतील. हा विजय आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे, असं आपचे नेते जरनेल सिंग यांनी सांगितलं.
आम्ही कायमच एक पूर्ण राज्याबाबत बोलत होतो. जे आज आम्हाला मिळालं आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचं प्रशासन दाखवून देऊ," असं आपचे नेते जरनेल सिंग यांनी व्यक्त केलं. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पंजाबमधील विजयावर पंजाबच्या जनतेचे अभिनंदन केलं आहे.
आप कांग्रेसचं रिप्लेसमेंट बनेल- राघव चड्ढा
लोकांच्या खिशातून पैसे काढून हे लोक आपले महाल सजवत आहे. आज यांच्या महालात लावण्यात आलेली एक एक विट ही सामान्य माणसाच्या कष्टाची आहे. या संपूर्ण व्यवस्थेला बदलायचं आहे. आज भारताच्या इतिहासातील मोठा दिवस आहे. येणाऱ्या दिवसांत आप कांग्रेसचं रिप्लेसमेंट बनेल, असं आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी सांगितलं.
आपच्या कार्यालयांमध्ये जल्लोष-
पंजाबमध्ये सुरूवातीच्या निकालांमध्ये आपनं मोठी मुसंडी मारली आहे. आपच्या कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंतसिग मान यांचा नवा पोस्टर समोर आला आहे.