सध्या देशात मोठ्या प्रमाणात दररोज कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून विरोधक सातत्यानं केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रानं कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी केल्या असल्याचा दावा माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केली आहे. लोकांची फसवणूक करण्याऐवजी सरकारनं कोरोनाच्या चाचण्य़ा वाढवल्या पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पी. चिदंबरम यांनी ट्विटरवर एक चार्ट शेअर केला आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी १८-१९ लाख चाचण्या होत असल्याच म्हटलं आहे. तसंच गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती संख्या १५ लाखांवर आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. "ही बिलकुल हैराण करणारी बाब नाही. हा संसर्ग कमी होण्याचा पुरावाही नाही. कमी चाचण्या करा, कोरोना बाधितांची संख्या कमी येईल. जर तुम्ही चाचण्याच केल्या नाही तर कोरोनाचं कोणतंही प्रकरणच समोर येणार नाही. सरकारनं लोकांची फसवणूक करून नये. त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे," असं चिदंबरम म्हणाले.
Coronavirus : कोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी केंद्रानं चाचण्या कमी केल्या; पी. चिदंबरम यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 09:34 IST
कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांचा केंद्रावर निशाणा. कोरोनाच्या चाचण्या कमी केल्यामुळे संख्या कमी येत असल्याचा चिदंबरम यांचा दावा
Coronavirus : कोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी केंद्रानं चाचण्या कमी केल्या; पी. चिदंबरम यांचा दावा
ठळक मुद्देकोरोनाच्या चाचण्या कमी केल्यामुळे संख्या कमी येत असल्याचा चिदंबरम यांचा दावातिसरी लाट अटळ असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा