शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

Rahul Gandhi Disqualification: “उसेन बोल्टही आश्चर्यचकीत होईल”; राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेसचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:54 AM

Rahul Gandhi Disqualification: कायद्याचा आधार घेऊन विरोधकांना गप्प करताय, हेच यातून सिद्ध होते, अशी टीका पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार आणि भाजपवर केली.

Rahul Gandhi Disqualification:काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. केवळ काँग्रेस नाही तर राहुल गांधी यांच्या कारवाईविरोधात देशातील विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी धावपटू उसेन बोल्टचा दाखला देत भाजपवर निशाणा साधला. 

मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. अशात राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांचे निवास रिकामे करण्याची नोटीस लोकसभेच्या हाऊसिंग कमिटीकडून देण्यात आली. यावरून काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ही बाब निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. 

उसेन बोल्टही आश्चर्यचकीत होईल

पी. चिदंबरम म्हणाले की, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर ज्या वेगाने मोदी सरकारने राहुल गांधी यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई केली, ती पाहता उसेन बोल्टही आश्चर्यचकीत होईल. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत सुनावण्यात आलेली ही सर्वांत मोठी आणि कठोर शिक्षा आहे. मानहानीच्या खटल्यात आतापर्यंत दोन वर्षांची शिक्षा कधी झाली, याबाबत पियुष गोयल किंवा केंद्रातील मोदी सरकाने समजवून सांगावे. कायद्याचा आधार घेऊन तुम्ही विरोधकांना गप्प करताय, हेच यातून दिसत आहे, या शब्दांत पी. चिदंबरम यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची झालेली शिक्षा हा आशेचा किरण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे. आम्ही प्रादेशिक पक्षांना प्रत्येक राज्यात काँग्रेसचा एक प्रतिस्पर्धी मानत आलो. मात्र, या परिस्थितीत ते सर्व पक्ष आमच्या बाजूने आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यापूर्वी कधीही काँग्रेससोबत नव्हते, मात्र आता ते आमच्यासोबत आहेत. विरोधकांची ही एकजूट भाजपविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. हा भाजपच्या कृतीचा निषेध आहे, असे शशी थरुर यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस