नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. 2008 सालापासून प्रियरंजन दासमुन्शी कोमामध्ये होते. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर मुन्शी कोमामध्ये गेले. आठवर्ष ते कोमामध्ये होते.
त्यांनी संसदेत पश्चिम बंगालमधील रायगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 1970 ते 71 दरम्यान ते पश्चिम बंगाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाचीही जबाबदारी संभाळली होती.