शीलेश शर्मानवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आपले अस्तित्व परत मिळविण्यासाठी काँग्रेस आतापासूनच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी जाहीरनाम्याबाबत चर्चा केली.
प्रियांका गांधी यांनी राज्यात थेट संवाद करण्यासाठी यापूर्वीच यात्रा सुरू केली आहे आणि त्या आता लखनौमध्ये थांबणार आहेत. यादरम्यान, राज्यातील मोठे नेते पक्षनेतृत्वावर दबाव टाकत आहेत की, काँग्रेसला जर निवडणूक जिंकायची आहे तर प्रियांका गांधी यांना आतापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले जावे.
प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, विवेक बन्सल, अजयकुमार लल्लू, मोना मिश्रा यांसारख्या नेत्यांचे असे म्हणणे आहे की, प्रियांका गांधी यांच्या नावावर पक्षात एकजूट होऊन पक्ष निवडणुकीत संघर्ष करू शकेल. मात्र, पक्ष सध्या मुख्यमंत्री पदाबाबत खुलासा करण्यास तयार नाही.