लखनौ - देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. त्याला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. यातच आता काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वडेरा यांनीही पक्ष कार्यकर्त्यांना कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी नागरिकंना आणि प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशकाँग्रेस कमिटीच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत, की कोरोना बाधिताची माहिती मिळताच संबंधित विभागाला सूचित करावे.
या पत्रात प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना, आपापल्या वॉर्डमधील निवडक सहकाऱ्यांचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार करावा. यामुळे प्रत्येक ब्लॉक/वार्डची माहिती मिळविणे सोपे होईल. कुणामध्येही या आजाराचे लक्षणे दिसली तर त्याला उपचारासाठी प्रेरित करावे.
जनतेला जागरुक करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर -प्रियंका यांनी म्हटले आहे, जनतेला कोरोनासंदर्भातील योग्य माहिती आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेली माहिती व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलच्या माध्यमातून द्यावी. वॉर्डमधील वृद्ध आणि आजारी लोकांची यादी तयार करावी आणि त्यांची मदत करावी. याशिवाय प्रत्येक वॉर्डमध्ये या महामारीसंदर्भातील आवश्यकती सर्व प्रकारची माहिती आणि आरोग्य विभागाचे निर्देश फोन आणि वॉट्सअॅपच्या माध्यमाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावेत.
सरकारने घोषित केलेले लॉकडाउन, कर्फ्यू, सोशल डिस्टंसिग आणि इतर निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा. याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासठी प्रशासनाची मदतकरा, असेही प्रियंगा गांधी यांनी म्हटले आहे.
पत्राच्या अखेरी, सर्वांनी आपापला स्वार्थ सोडून समाजाच्या कल्यानासाठी जनतेची मदत करण्याची आवश्यकता आहे. मला माहित आहे, की आपण सर्वजण देशासाठी आपापली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहात. या कठीन परिस्थितीत, मी आपल्या सर्वांसोबत आहे. आपणही आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.