राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:10 AM2021-02-04T08:10:20+5:302021-02-04T08:25:18+5:30
ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला.
नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जीव गमावणाऱ्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूवर राजकारण तापले आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रामपूरयेथे जात आहेत. प्रियांका गांधींशिवाय आज राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) नेते जयंत चौधरीदेखील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. आज नवरीत सिंग यांचा अखेरचा 'अरदास' कार्यक्रम आहे. प्रियांका गांधी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांतवण करणार आहेत.
ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली येऊन नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. छवविच्छेदनाच्या अहवालातही, नवरित सिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हणण्यात आले आहे.
"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"
लल्लू सिंहदेखील उपस्थित -
प्रियांका गांधी अपल्या दिल्ली येथील निवासस्थानाहून निघाल्या आहेत. त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा ही आहे. याच ताफ्यात उत्तर प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंह देखील उपस्थित आहेत. तसेच प्रियांका गांधी समर्थकदेखील त्यांच्यासोबत जात आहेत. NH-24 मार्गाने प्रियांका गांधी यूपीतील रामपूर येथे जात आहेत.
Delhi: Congress leader Priyanka Gandhi is en route to Rampur, Uttar Pradesh
— ANI (@ANI) February 4, 2021
Visuals from the Sahibabad area pic.twitter.com/eBlKixVH45
मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी
गेल्या 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात चर्चा होऊन मार्गही निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही उपद्रवी मंडळी या मार्गाने न जाता, अक्षरधाम, आयटीओ मार्गे थेट लालकिल्ल्यापर्यंत पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी एका सांप्रदायाचा झेंडाही तेथे लावला होता.
शेतकरी मागे हटणार नाहीत -
"सरकार शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेले पाहिजे. मी शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारलाचा मागे हटावे लागेल," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना
शेतकऱ्यांना धमकावण्याचे काम
"सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचे, धमकावण्याचे काम हे सरकारचे नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचे निराकरण करणे हे त्यांचे काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही," असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.