नवी दिल्ल - पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालसह आसाममध्येही (Assam) निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा म्हणून प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka gandhi vadra) पूर्वेकडील राज्यांत दौराकरून अंदाजही घेत आहेत आणि वातावरण निर्मितीही करत आहेत. आज मंगळवारी प्रियंका गांधींचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो समोर आले. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS) आसामच्या अस्तित्वाला धोका असल्याचे म्हटले आहे. (Congress leader Priyanka gandhi vadra Commented on bjp rss and caa)
प्रियंका यांनी एका स्थानीक वृत्त वाहिनीशी बोलताना, पंतप्रधानांच्या 'आसाममधील चहा धोक्यात आहे.' या विधानावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, एखादे ट्विट केलेल्या आसामचा चहा धोक्यात येत नाही. आसामच्या अस्तित्वावर जो घाव भाजप आणि आरएसएसने घातला आहे, तोच त्याच्या अस्तित्वाला धोका आहे. ना येथे डबल इंजिनचे सरकार हवे आहे, ना रिमोट कंट्रोल असलेले. आसामच्या जनतेला एक नेता, एक सीएम आणि एक पक्ष हवा आहे. जो त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करून त्यांच्यासाठी काम करील.
CAA आणि NRCच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना प्रियंका म्हणाल्या, देशाची एकता त्यांच्यासाठी समस्या आहे. राज्याची एकताही त्यांच्यासाठी समस्या आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशात CAA-NRCवर भाष्य केले. मग ते येथे आल्यानंतर गप्प का होतात. भाजपने निवडणुकीपूर्वी म्हटले होते, की आसाममध्ये NRC लागू करणार नाही. मग लागू का केली? असा सवालही प्रियांका यांनी भाजपला केला.
तेजपूरच्या रॅलीत काय म्हणाल्या प्रियांका? प्रियंका गांधी यांनी तेजपूर येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. प्रियंका म्हणाल्या, आसाम तुमची आई आहे आणि आपण आपली ओळख आणि अस्तित्वाचा बचाव करण्यासाठी लढत आहात. भाजपने आपल्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आम्ही आपल्याला आश्वासन नाही हमी देत आहोत. या पाच हमी आपले चांगले भविष्य घटविण्यासाठी आहेत.
आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO
1- आम्ही असा कायदा तयार करू, ज्यामुळे येथे CAA लागू होणार नाही.2- आसाममधील गृहिणींसाठी दर महा 2000 रुपये गृहिणी सन्मान निधी दिला जाईल.3- 200 यूनिट वीज मोफत दिली जाईल. यातून दर महिन्याला 1400 रुपयांची बचत होईल.4- चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी 365 रुपये मजुरी दिली जाईल.5- आम्ही युवकांना 5 लाख रोजगार देऊ.