प्रियंका गांधींना पोलिसांनी अक्षरशः ओढत, खेचत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं, पाहा संपूर्ण Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:18 PM2022-08-05T18:18:31+5:302022-08-05T18:20:01+5:30
प्रियांका गांधी यांना ताब्यात घेताना महिला पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला.
नवी दिल्ली- देशातील महागाईविरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी दिल्लीतही काँग्रेसकडून महागाईविरोधात निदर्शने सुरू असताना पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेसच्या या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चा काढल्याने पोलिसांनी नेत्यांसह अनेक कार्यकत्यांनी धरपकड सुरु केली.
प्रियांका गांधी यांना ताब्यात घेताना महिला पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अक्षरशः ओढत, खेचत पोलीस व्हॅनमध्ये बसवल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नवी दिल्लीः काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अक्षरशः ओढत, खेचत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं! #CongressProtest#PriyankaGandhi#RahulGandhi@INCIndia@INCIndiapic.twitter.com/YUlZRsUMo0
— Lokmat (@lokmat) August 5, 2022
आमच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमच्या खासदारांसोबत गैरवर्तन केले, त्यांना ओढले. काहींना यावेळी पोलिसांनी मारहाणदेखील केली. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्व पाहत आहात. महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, पण केंद्र सरकार आम्हाला आंदोलन करू देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
ये संघर्ष सड़क का है...इस संघर्ष में समझौता मंजूर नहीं।@priyankagandhi जी का ये संदेश हर कांग्रेसजन का संदेश है।#महंगाई_पर_हल्ला_बोलpic.twitter.com/6RHFu0OuXQ
— Congress (@INCIndia) August 5, 2022
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. मात्र तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे.
महाराष्ट्रातही काँग्रेसचं आंदोलन-
दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतलं. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली.