लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:18 PM2024-10-23T13:18:06+5:302024-10-23T13:18:30+5:30

सोशल मीडियावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

congress leader Rahul Gandhi and asaduddin owaisi target Lawrence Bishnoi death threats Filed a case | लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

काही दिवसापूर्वी मुंबई माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईची टोळी पुन्हा चर्चेत आली. दरम्यान, आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एमआयएमचे नेते ओवैसी यांना सोशल मीडियावरुन धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोसह ही धमकी फेसबुकवर शेअर करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
 
एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीतील सिगरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एनएसयूआयने सोशल मीडिया वापरकर्त्याविरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी  यांच्यासह एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याही नावाचा उल्लेख आहे.

एनएसयूआय पूर्व उत्तर प्रदेशचे अध्यक्ष ऋषभ पांडे यांनी सांगितले की, बुद्धादित्य मोहंती नावाच्या वापरकर्त्याने खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच लॉरेन्स बिश्नोईचा फोटो पोस्टमध्ये दिला आहे.

एनएसयूआयच्या कार्यकर्ते म्हणाले, राहुल गांधी प्रत्येक विभागातील लोकांना सोबत घेत आहेत, संविधानाच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत आणि अशा परिस्थितीत ते देशाची सर्वात मोठी आशा आहेत. त्यांच्याविरोधात असा विचार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. एफआयआर व्हावी, अशी आमची मागणी आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा.

बाबा सिद्दिकी प्रकरणात आणखी एक खुलासा

 गोळीबार करणारे हे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचाच हात असल्याची खात्री आता अधिकाऱ्यांना झाली आहे. मात्र, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

अभिनेता सलमान खानशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. अनमोल बिश्नोई हा शूटर आणि कट रचणारा प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात असल्याचं डिजिटल पुराव्यांवरून समोर आलं आहे. अनमोल कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.

Web Title: congress leader Rahul Gandhi and asaduddin owaisi target Lawrence Bishnoi death threats Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.