पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 10:46 AM2020-02-14T10:46:40+5:302020-02-14T11:03:02+5:30

पुलवामा हल्ल्याला वर्ष पूर्ण; राहुल गांधींचे तीन प्रश्न

Congress Leader Rahul Gandhi Asks Three Questions about Pulwama Attack | पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

Next

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झालं आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या हौतात्म्याला देशभरातून वंदन केलं जात आहे. तर यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे. राहुल यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. 

राहुल गांधीनी ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. 'पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या त्रुटींमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधल्या कोणाला जबाबदार धरण्यात आलं?,' असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत. राहुल गांधींच्या या ट्विटवरुन भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.





'राहुल गांधींना लाज वाटायला हवी. पुलवामा हल्ल्याचा फायदा कोणाला झाला विचारता? इंदिरा-राजीव यांच्या हत्येचा फायदा कोणाला झाला असं देशानं विचारलं, तर काय उत्तर द्याल? घाणेरडं राजकारण करू नका. लाज बाळगा,' असं कपिल मिश्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदन केलं आहे. 'गेल्या वर्षी पुलवाम्यात झालेल्या भीषण हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करतो. ते सगळे असमान्य होते. त्यांनी देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या हौतात्म्याला कधीही विसरणार नाही,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read in English

Web Title: Congress Leader Rahul Gandhi Asks Three Questions about Pulwama Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.