नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झालं आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या हौतात्म्याला देशभरातून वंदन केलं जात आहे. तर यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे. राहुल यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधीनी ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. 'पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या त्रुटींमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधल्या कोणाला जबाबदार धरण्यात आलं?,' असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत. राहुल गांधींच्या या ट्विटवरुन भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.
पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 10:46 AM