नवी दिल्ली - कोरोना काळात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांवर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुहुर्तावरही मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुणाचेही नाव न घेता विशेष अंदाजात सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत हॅशटॅगसह लिहिले आहे, की "हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड लपण्याचा दिवस नाही."
सोनिया गांधींनीही बोलावली महत्त्वाची बैठक, महाविकास आघाडीवर चर्चा?
आजच एक बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "जीवनाची किंमत लावणे अशक्य आहे - सरकारने दिलेली नुकसानभरपाई ही एक छोटीशी मदत असते. मात्र, मोदी सरकार, असे करायलाही तयार नाही. कोरोना महामारीच्या काळात, आधी उपचारांची कमतरता, नंतर खोटी आकडेवारी आणि वरून सरकारचे क्रौर्य!"
...म्हणून लोकांचा जीव जातोय -तत्पूर्वी गेल्या आठवड्यातही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला होता. "देशात तात्काळ लसीकरण पूर्ण करायला हवे, मोदी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेली लसींची कमतरता लपविण्यासाठी भाजपकडून दररोजचा खोटेपणा आणि घोषणाबाजी कामाची नाही, असे राहुल गांधींनी म्हटले होते. तसेच, पंतप्रधानांची खोटी प्रतिमा सावरण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्नच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. यामुळेच, लोकांचा जीव जात आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.
Sharad Pawar : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू