नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. करोना महामारीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थत करत आहेत. यावेळी राहुल यांनी लसीकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. लसीकरण हीच महामारीला नियंत्रणात आणण्याची किल्ली आहे. मात्र, भारत सरकारला याची चिंताच नाही, असे वाटते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दिसले. हा ग्राफ 1 एप्रिलते 20 मेपर्यंतचा आहे. यात लसीकरणाचा वेग घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.
आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये
राहुल गांधी यांनी रविवारीही गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवरून केंद्रावर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत लिहिले होते, "मला मृतदेहांचे फोटो शेअर करायला आवडत नाही. संपूर्ण जग फोटो पाहून दुःखी आहे. मात्र, अनेकांना आपल्या नातलगाचा मृतदेह मजबुरीने गंगा नदीच्या काठावरच सोडावा लागला. त्यांच्या वेदनाही समजून घ्याव्या लागतील. चूक त्यांची नाही. ही जबाबदारी सामूहिकही नाही. केवळ केंद्र सरकरची आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
टाटांनी पुन्हा मनं जिंकली! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार देणारी घोषणा"एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी" -यापूर्वी राहुल गांधी यांनी एक बातमी ट्विट केली होती. त्याला राहुल गांधी यांनी कॅप्शन देत, "एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी", असे लिहिले होते. राहुल यांनी ट्विट केलेल्या बातमीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांसंदर्भात भाष्य करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइननुसार देशात कोरोना लसींचा साठा उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारने लसीकरणाची घोषणा केली, असा आरोप सीरमच्या सुरेश जाधव यांनी केला होता. याची ती बातमी होती.