काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, तसंच अर्थसंकल्पावर भाष्य करत सरकारवर टीकेचा बाण सोडला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात आला पाहिजे असं मत व्यक्त केलं. शेतकरी हा देशाचा कणा आहेत आणि सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. "शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का?," असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. "शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांशी चर्चा करणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे आहे. आज दिल्लीला शेतकऱ्यांचा वेढा आहे. का दिल्लीला आज तटबंदी घालण्यात येत आहे?," असंही ते म्हणाले.
मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 4:37 PM
सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप
ठळक मुद्देसरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोपशेतकऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवणं सरकारचं काम, राहुल गांधींचं वक्तव्य