National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी सक्तवसूली संचलनालयानं राहुल गांधी यांची चौकशी केली. तिसऱ्या दिवशीही त्यांची जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. राहुल गांधी रात्री साडेनऊच्या सुमारास एपीजे अब्दुल कलाम रोड येथे असलेल्या ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. तीन दिवसांमध्ये तब्बल तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली.
राहुल गांधी यांना शुक्रवारी पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. बुधवारी त्यांना त्यांच्या यंग इंडियामधील हिस्स्याशी निगजीत डॉक्युमेंट्सच्या आधारावर प्रश्न विचारण्यात आले. ईडीद्वारे त्यांना जवळपास ३५ प्रश्न विचारण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास राहुल गांधी चौकशीसाठी ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.
८०० जण ताब्यातदिल्ली पोलिसांचे विशेष कायदा आणि सुव्यवस्था डीपी हुड्डा म्हणाले की, काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आले आहेत, आम्ही सांगूनही काही लोकांनी ऐकले नाही. विविध ठिकाणांहून १५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, तीन दिवसांत आतापर्यंत सुमारे ८०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.