National Herald Case Live Rahul Gandhi ED Inquiry: नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. सकाळच्या सुमारास राहुल गांधी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. पहिल्या दिवशी त्यांची तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, ईडीनं त्यांना मंगळवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं आहे.
सोमवारी सकाळी सुरूवातीला त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर लंच ब्रेकदरम्यान राहुल गांधी सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर ते पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात तब्बल साडेपाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, राहुल गांधी यांना पुन्हा एकदा उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यात सांगण्यात आल्याची माहिती एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींना प्रश्न विचारले आहेत. सुरुवातीला खासगी प्रश्न विचारल्यानंतर मालमत्ता आणि आर्थिक देवाण-घेवाणीबाबत प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आले. राहुल गांधी यांना यंग इंडिया आणि आणि असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडशी संबंधित प्रश्न विचारले.- भारतामध्ये तुमची किती संपत्ती आहे आणि कुठे कुठे आहे?- किती बँकांमध्ये खाते आहे. तसेच त्यामध्ये किती रक्कम जमा आहे?- परदेशातील कुठल्या बँकेत खाते आहे? त्यामध्ये किती रक्कम जमा आहे. - परदेशात कुठली संपत्ती आहे, असल्यास कुठे आहे? - यंग इंडियनशी कसा संबंध आला?- ईडीने राहुल गांधींना प्रश्न विचारून यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या पार्टनरशिपचा पॅटर्न, आर्थिक देवाण-घेवाण आणि प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्याचा प्रश्न केला.- राहुल गांधींना यंग इंडियनची स्थापना, नॅशनल हेराल्डच्या संचालन आणि पैशांच्या कथित हस्तांतरणाबाबत प्रश्न विचारले जातात. - यंग इंडियनच्या प्रवर्तक आणि शेअरधारकांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही इतर सदस्यही आहेत.