बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:22 PM2020-07-20T18:22:50+5:302020-07-20T18:50:24+5:30
राहुल यांच्या १० आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट व्हायरल; सोशल मीडियावर लूकची चर्चा
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. कोरोना संकटाची हाताळणी आणि लॉकडाऊनचा गरिबांना बसलेला फटका या मुद्द्यांवर राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत आहेत. या व्हिडीओतील राहुल गांधी यांच्या लूकची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामधील राहुल यांचा लूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओत राहुल यांचे केस काहीसे कुरळे दिसत होते. त्यांनी हाफ टीशर्ट परिधान केला होता.
Since 2014, the PM's constant blunders and indiscretions have fundamentally weakened India and left us vulnerable.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 17, 2020
Empty words don't suffice in the world of geopolitics. pic.twitter.com/XM6PXcRuFh
#RahulGandhi's transformation
— Abhijit Kuldhariya (@Abhi_Kuldhariya) July 17, 2020
in 6 days. How? #RahulStuntFlopspic.twitter.com/2GmsAyXDev
राहुल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर जोरदार टीका केली. या व्हिडीओत त्यांचे केस काहीसे मोठे आणि कुरळे दिसत आहेत. याशिवाय थोडी दाढीदेखील दिसत आहे. मात्र आठवड्यापूर्वीच्या व्हिडीओत राहुल यांचे केस अतिशय लहान दिसत होते. राहुल यांनी क्लिश शेव्ह केली होती.
Pic 1: Rahul Gandhi's look on 10th July
— Ankur Singh (@iAnkurSingh) July 17, 2020
Pic 2: Rahul Gandhi's look on 17th July
Such transformation in just 7 days? How is it possible?
Is Rahul sharing old videos after editing out all his jokes? pic.twitter.com/hWPw4OI35O
Rahul Gandhi looked fantastic in the video..
— Asturias (@Maximalt88) July 18, 2020
A total retro look..Early 70's..Long hair..Long sideburns..
राहुल यांच्या दोन लूकची तुलना करून अनेक जण सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अवघ्या सात दिवसांत राहुल यांचा लूक इतका कसा बदलला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण हा राहुल यांचा जुना लूक असून व्हिडीओ आधी चित्रित झाल्याचा दावा केला आहे. राहुल यांच्या १० जुलै आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून अवघ्या आठवड्याभरात लूक इतका कसा काय बदलू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.