राहुल गांधी ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात, संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:49 PM2024-09-24T12:49:53+5:302024-09-24T12:51:41+5:30

आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात कोल्हापूरला येत आहेत. या ठिकाणी ते ...

Congress leader Rahul Gandhi on a visit to Kolhapur for the Constitution Honor Conference on October 5 | राहुल गांधी ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात, संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार

राहुल गांधी ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात, संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार

आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात कोल्हापूरला येत आहेत. या ठिकाणी ते संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करतील.

कोल्हापूर ही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची भूमी आहे. त्यांच्या ऐतिहासिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातच राहुल गांधी यांनी संविधान संमेलनाची सुरुवात केली होती. या संमेलनात सामाजिक संघटना, जय भीम संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी आदी संघटनांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात येते. यात महिला संघटनांचाही सहभाग असतो.

या संमेलनाच्या माध्यमातून राहुल गांधी हे पक्षाच्या भूमिकेतून बाहेर येऊन स्वत:ला सामाजिक न्यायासोबत जोडू इच्छितात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा या संमेलनाशी संबंध असणार नाही. तथापि, निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये संविधान संमेलन झाले होते.

Web Title: Congress leader Rahul Gandhi on a visit to Kolhapur for the Constitution Honor Conference on October 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.