बिहार: विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना बिहारमध्ये पोस्टर वॉर सुरू झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसला होता. आता पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.भाजपा आरक्षणविरोधी असून आरक्षण संपवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसनं वारंवार केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील अनेकदा यावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. यानंतर आता बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा विषय तापू लागला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाटण्यातल्या रस्त्यावर राहुल यांचे पोस्टर लावले आहेत. 'आरक्षण हटवू देणार नाही,' असा मजकूर या पोस्टरवर आहे. यामध्ये राहुल यांचा फोटो एखाद्या हिरोसारखा लावण्यात आला असून त्याखाली अवतार शब्द लिहिण्यात आला आहे.
आरक्षण वाचवण्यासाठी राहुल गांधींचा 'अवतार'; काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 1:00 PM