'नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह...PM, गुलाबी चष्मा उतरवा...'; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:29 PM2021-05-11T13:29:56+5:302021-05-11T13:33:12+5:30

Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River : राहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

congress leader rahul gandhi slams pm modi over coronavirus delhi central vista dead bodies in river | 'नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह...PM, गुलाबी चष्मा उतरवा...'; राहुल गांधींचा निशाणा

'नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह...PM, गुलाबी चष्मा उतरवा...'; राहुल गांधींचा निशाणा

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा.युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किंचितसा दिलासा मिळाला असला तरी धोक्या अद्यापही टळलेला नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोरोनाच्या परिस्थितीवरुन केंद्रावर सातत्यानं टीका करताना दिसत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही ठिकाणांहून कोरोना संकटकाळातही नद्यांमध्ये मृतदेह वाहून येत असल्याचं वृत्त सोर आलं होतं. यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River
 
Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका

"नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली. दिल्लीत उभारल्या जात असलेल्या सेंट्रल विस्तावरून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसनंही पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. जेव्हा देशात मोठी महासाथ आहे, लोकं ऑक्सिजन आणि रुग्णालयांसाठी फिरत आहेत, अशा वेळी अशा प्रकल्पांवर खर्च करणं अयोग्य आहे, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. 



युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. बिहारनंतर उत्तर प्रदेश, बिहार सीमेवरील गावातही मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. जे पाण्यावर तरंगत होते. कोरोना काळात लाकडांची कमतरता भासत असल्यानं लोकं हे मृतदेह थेट नदीत फेकत असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं. 

Web Title: congress leader rahul gandhi slams pm modi over coronavirus delhi central vista dead bodies in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.