शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
4
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
5
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
6
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
7
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
8
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
9
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
10
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
11
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
12
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
13
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
14
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
16
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
17
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
19
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
20
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!

'नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह...PM, गुलाबी चष्मा उतरवा...'; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 1:29 PM

Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River : राहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

ठळक मुद्देराहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा.युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किंचितसा दिलासा मिळाला असला तरी धोक्या अद्यापही टळलेला नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोरोनाच्या परिस्थितीवरुन केंद्रावर सातत्यानं टीका करताना दिसत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही ठिकाणांहून कोरोना संकटकाळातही नद्यांमध्ये मृतदेह वाहून येत असल्याचं वृत्त सोर आलं होतं. यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका"नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली. दिल्लीत उभारल्या जात असलेल्या सेंट्रल विस्तावरून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसनंही पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. जेव्हा देशात मोठी महासाथ आहे, लोकं ऑक्सिजन आणि रुग्णालयांसाठी फिरत आहेत, अशा वेळी अशा प्रकल्पांवर खर्च करणं अयोग्य आहे, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेहबिहारच्या बक्सर जिल्ह्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. बिहारनंतर उत्तर प्रदेश, बिहार सीमेवरील गावातही मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. जे पाण्यावर तरंगत होते. कोरोना काळात लाकडांची कमतरता भासत असल्यानं लोकं हे मृतदेह थेट नदीत फेकत असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारRahul Gandhiराहुल गांधी