शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य, तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 07:59 PM2021-03-10T19:59:14+5:302021-03-10T20:01:04+5:30
Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होऊन १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. "शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य आहे आणि सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील," असं ते म्हणाले.
"अन्नदात्यांचं पावसाची जुनं नातं आहे. ते ना घाबरतात ना वातावरणाचं काही कारण देतात. या क्रुर सरकारला पुन्हा सांगा, शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य आहे, तिन्ही कायदेच मागे घ्यावे लागतील, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी प्रियंका गांधी यांनीदखील आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं म्हटलं होतं.
अन्नदाता का बारिश से नाता पुराना
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 10, 2021
ना डरते ना करते मौसम का बहाना
तो क्रूर सरकार को फिर से बताना
असंभव किसानों को पीछे हटाना
तीनों क़ानूनों को पड़ेगा लौटाना! #FarmersProtests
... तरीही मागे हटणार नाही
"माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तोवर मी लढणार. यासाठी मग १०० दिवस असो किंवा १०० वर्ष. संसदेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला. आंदोलनजीवी, परजीवी असा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला. दिल्लीतील सीमेप्रमाणेच प्रत्येक गावागावात आंदोलन करा. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहिल. सुख आणि दु:ख काहीही असो आम्ही तुमच्यासाठी कायम उभ असू. तुमची लढाई माझी आहे," असंही प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनपासून पाकिस्तान सर्व ठिकाणी फिरून आले. 'हम दो हमारे दो' मित्र सरकार चालवत आहेत. जे प्रकर्षानं दिसूनही येत आहे. सरकारला तुमचं ऐकावंच लागेल. असा माहोल तयार करा की सरकार तुमच्या सुनावणीशिवाय सरकार पुढे जाऊ शकणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं होतं.