नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी कोरोना (CoronaVirus) विरोधातील रणनीतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘‘केंद्र सरकारची कोविड रणनीती- पहिला टप्पा- तुघलकी लॉकडाउन लावणे. दुसरा टप्पा- घंटी वाजवणे. तिसरा टप्पा- देवाचे गुण गा,’’ असा आहे. (Congress leader Rahul Gandhi targets the central government on corona related strategy)
यातच काँग्रेस सरचचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी लोकांना आवाहन केले आहे, की ‘‘प्रीय देशवासियांनो, हा काळ आपल्या सर्वांसाठीच संकटाचा काळ आहे. आपल्या सर्वांचे प्रिय लोक, कुटुंबीय, जवळपासचे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आपल्या सर्वांना विनंती करते, की मास्क लावा आणि कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करा. ही लढाई आपण सावधपणे जिंकायला हवी.’’
2.17 लाख नवे कोरोनाबाधित - गेल्या 24 तासांत देशात 2,17,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 1185 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट म्हणजे, 1,18,302 जण कोरोनावर मात करून ठणठणीत बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी देशात 2,00,739 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. तर गेल्या 30 सप्टेंबरला देशात अकराशे हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 42 लाख 91 हजार 917वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1,74,308 वर पोहोचला आहे.
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!
11.72 कोटी लशी देण्यात आल्या आहेत -देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशभरात 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 कोरोना डोस देण्यात आले आहेत. काल 27 लाख 30 हजार 359 डोस देण्यात आले. लशीचा दुसरा डोस देण्याच्या अभियानाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे.
कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक -देशातील कोरोना मृत्यूदर 1.23 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 88 टक्के एवढा आहे. अॅक्टिव्ह केसमध्ये वाढ होऊन ते 10 टक्क्यांच्याही वर पोहचले आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत आता भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर एकूण संक्रमित रुग्ण संख्येच्या बाततीत दुसरा क्रमांक लागतो.
"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"